बातमीपत्र

गारपीट अवकाळी पाऊसाने धनगर समाजाचे मोठे नुकसान झाल्याने धनगर समाज हतबल झाला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे 50 ते साठ लहान मोठ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मुलाबाळांच्या उदरनिर्वाहासाठी रानोमाळ फिरणारा धनगर समाज आज वादळवारा पावसामुळे भयभीत झाले आहे.त्यांना शासनाकडून त्वरित नुसकान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी शासनाकडे मदतीसाठी हात पुढे केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी जानवी मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामे केले.त्याच बरोबर पशुवैद्यकीय डॉक्टर गायकवाड व मुळूक यांनी आजारी मेंढ्यांना वर त्वरित उपचार सुरु केले असुन यावेळी वरुडे गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती शेठ थिटे संतोष तांबे पोलीस पाटील प्रकाश माधु किसन करगळ. गजू मस्कू करगळ. अंकुश झिटे अंबादास करगळ. बापू करगळ. संतोष कर गळ. बिरू करगळ. सिद्धू करगळ. बीजेपीचे संघटक.के.एस.भोर.महादू किसन करगळे,वैभव गावडे गाडकवाडी गाव सरपंच रामभाऊ रणपिसे हनुमंत काबंळे अविनाश चौधरी,वरूडे गावचे तलाठी श्रीमती मनिषा जानराव,सरपंच दिलीपराव चौधरी व सर्व वरुडे गावचे ग्रामस्थ आजी-माजी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी या मेंढपाळांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा केली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा