बातमीपत्र

मनसेचा विधी विभाग मुंबई महानगर पालिका निवडणूकांसाठी सज्ज..कायदेशीर विषयांवरील चर्चासत्र संपन्न..चर्चासत्रास मनसेच्या नेत्यांची हजेरी..मुंबईतील वकिलांनी निवडणूकपूर्व केली अभ्यासात्मक तयारी मुंबईतील महानगर पालिकेच्या निवडणूकीची कायदेशीर बाब विधी विभाग पाहणार 
दिनांक १९ डिसेंबर २१ रोजी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहीत  कक्ष आणि विधी विभागाच्या वकिलांचे - मुंबईतील परळच्या सेंट्रल रेल्वे सभागृहात निवडणूक तयारी बाबतचे चर्चा सत्र पार पडले.मनसे जनहित कक्ष आणि विधी विभागाचे अध्यक्ष ऍड किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.मनसे चे नेते आणि माजी आमदार मा.नितीन सरदेसाई आणि मनसेचे सरचिटणीस मा.किर्तीकुमार शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले. या चर्चासत्रास प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे उपाध्यक्ष व वरळी विधानसभेचे अध्यक्ष मा.संजय जामदार,उपाध्यक्ष मा. बंटी म्हशीलकर,मनसे महिला सरचिटणीस मा.सुप्रियाताई दळवी आणि शिवडी विधानसभेच्या महिला विभाग अध्यक्षा मा.नम्रता ताई पवार उपस्थित होते.मान्यवरांनी विधी विभागाच्या कामकाजाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर निवडणूकच्या कामकाजाचा अनुभव असणारे श्री.कसबे,श्री.पाटील,श्री.घरत साहेब यांनी निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती दिली तर वकिलांनी उपस्थित केलेल्या  प्रश्नाचे निरसन देखील केले.
सदर आयोजन कार्यक्रमाचे मनसे विधि विभागाचे सरचिटणीस ऍड.संतोष सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ऍड संतोष सावंत यांनी पार पाडले तर शेवटी ऍड नितीश सोनावणे यांनी सर्वांच्या उल्लेखनीय कामगिरी चा आढावा घेत आभार मानले.   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा