दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून तसेच दैनिक सम्राट मधील वार्तांकन , शोध युगाचा या शोधक बातमी च्या ब्लॉग साठी तसेच
लाइव्ह महाराष्ट्र टी वी न्युज चॅनेल तसेच प्रगत महाराष्ट्र न्युज या चॅनेल चा प्रमुख कायदेशीर सल्लागार तसेच वार्ताहर या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ संतोष सावंत यांनी पत्रकारिता विषयांवर मुंबई विद्यापीठातुन पदविका देखील संपादन केलेली असून सदरचा पुरस्कार येत्या शिवजयंती दिवशी दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कल्याण च्या आचार्य अत्रे रंगमंदिरात शिक्षण संवेदन मासिकाच्या १५ व्या वर्धापनदिनी देण्यात येणार आहे. डॉ संतोष सावंत यांना आधीही "सामाजिक", "धार्मिक" , आणि "साहित्य" या क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या या अष्टपैलू कामगिरी बाबत त्यांचे अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...
