बातमीपत्र

उर्वशी रौतेलाने FDCI लॅक्मे फॅशन वीकमध्ये रेनू टंडन आणि निकिता टंडन च्या  फिनाले शो मध्ये शोस्टॉपर बनून रॅम्पवर आग लावली.

उर्वशी रौतेला तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि तिच्या मोहक रूपाने आपल्याला मोहून टाकण्यात कधीही अपयशी ठरली नाही. बॉलीवूडच्या सर्वात तरुण सुपरस्टारने  ह्यावेळी देखील अजिबात मागे वळून पाहिले नाही, आणि दिल्लीत झालेल्या FDCI लॅक्मे फॅशन वीक 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये तिने रॅम्प स्वतःच्या सौंदर्याने उजाळून टाकला आणि आम्हा सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकली.  उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डल द्वारे रेनू टंडन आणि निखीता टंडन या दिग्गज डिझायनर्सचे सुंदर  पोशाख धारण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत , उर्वशी त्या ड्रेसमध्ये एकदम छान दिसत होती, ह्यात अभिनेत्रीने बॉडी फिटिंग ड्रेस घातला होता ज्यामध्ये डीप व्ही कट लाइन होती. कंबरेवरील विशिष्ट कट्स मुळे तिच्या टोन्ड शरीराला अजून आकर्षक रूप मिळाले. फुल फुग्याच्या आणि ड्रेसमध्ये फ्लोरल  प्रिंट  डिसाइन  होते जे फ्लॉन्ट   करताना उर्वशी अत्यंत मोहक दिसली. मेकअपबद्दल बोलायचे झाले तर, उर्वशी सर्व न्यूड शेड्सचा वापर केला होता, रेखीव स्मज न्यूड आयशॅडोसह फिकट गुलाबी लिपशेड लावून तिने संपूर्ण लुक सजवला. केसांबद्दल बोलताना, अभिनेत्रीने तिच्या लूकला उंच, लांब स्लिट पोनीटेलने सजवले , ज्यामुळे ती अविस्मरणीय  दिसत होती. अभिनेत्रीने पूर्ण आत्मविश्वासाने आणि ग्रेसफुल्ली रॅम्प वॉक केला, ज्याने निश्चितच संपूर्ण लाइमलाइट आणि प्रेक्षकांची मने जिंकली. उर्वशी शोस्टॉपर असल्याने, रेनू टंडन आणि निखीता टंडन च्या प्रीत रिसॉर्ट कलेक्शनसाठी   "I am worth It"  या संदेशाची जाणीव कशी करतात आणि लोकांचे लक्ष कसे वेधुन घेतात हे तिला माहित होते. साठी प्रेस रिसॉर्ट  डिझायनर, संपूर्ण रॅम्पवॉल्कची संकल्पना  महिला सबलीकरणाचे महत्त्व पसरवणे होती आणि स्त्रिया खूप आणि सगळ्यात जास्त वर्थ इट आहेत हा फॅशन शोमागचा एम होता https://www.instagram.com/p/CbnFCCMj89U/ https://www.instagram.com/p/CbnEMLEMPRd/ https://www.instagram.com/p/CbnHWLoseqd/ उर्वशीच्या कामाबद्दल  बोलायचं झालं तर , उर्वशी रौतेला मिस युनिव्हर्स पेजेंट 2021 ला जज करताना दिसली होती, अभिनेत्रीनचे  अरब फेम मोहम्मद रमजान सोबत तिच्या आंतरराष्ट्रीय गाण्यावर वर्साचे बेबीसाठी देखील कौतुक झाले होते . उर्वशी जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही अभिनेत्री द्विभाषिक थ्रिलर “ब्लॅक रोझ” सोबत “थिरुत्तू पायले 2” च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री सरवणासोबत २०० कोटींच्या बिग बजेट चित्रपट ‘द लीजेंड’मधून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा