मुंबई : त्रिशुर (केरळ) येथे झालेल्या पैरा मास्टर्स नँशनल इंडोर गेम्स् मध्ये महाराष्ट्रा तर्फे मुंबईच्या सुशिल नामदेव शिंदे याने १० मिटर्स एअर रायफल शुटिंग मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. सुशिल च्या या यशामुळे कंसाय, जपान येथे २०२२ मध्ये होणा-या वर्ल्ड पँरा मास्टर्स गेम्ससाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुशिल हा ताराई फाऊंडेशन संस्थे तर्फे गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन दिव्यांगांना नृत्य, गायन, अभिनय व खेळाचे प्रशिक्षण ड्रीम्स अकादमी फॉर दि डिसँबल्ड या नावाने अगदी मोफत देत आहे. आर्थिक बाजु कमकुवत असलेल्यामुळे सुशिल ला सदर स्पर्धे मध्ये जाण्यासाठी आमदार प्रसाद लाड, महापौर किशोरीताई पेडणेकर, नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेवक श्रीकांत शेट्ये तसेच इंसानियत संस्थेचे अध्यक्ष अर्जुन मेघे आदिंनी मौलाचे सहकार्य केले.
