देशातील भाजपाई मोदी सरकार करत असलेल्या कृत्रिम दरवाढी मुळे भारतीय जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. मोदी सरकार निवडणूक आली की पेट्रोल,डिझेल, घरगुती गॅस, खाद्य तेल व इतर वस्तूंचे भावस्थिर ठेवतात. निवडणूक झाली की पुन्हा कृत्रिम भाववाढ सुरू होते.त्याचा निषेध आणि जनजागृतीसाठी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांचे नेतृत्वात शुक्रवार १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वा. वसई तहसिलदार कार्यालया समोर आंदोलन करून मा. राष्ट्रपती यांस मा.तहसिलदार द्वारे निवेदन देण्यात आले.सदर आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष राजू गव्हाणकर,कुमार काकडे, बिना फुर्त्याडो जिल्हा पदाधिकारी किरण शिंदे, प्रकाश पाटील, रामदास वाघमारे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिलेश उपाध्याय, रॉईस फरेल कॉग्रेस चे पदआधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
