शोषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांची दुर्दशा संपली पाहिजे. लाखांचा पोशिंदा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे भारतीय जीवन पद्धतीचा प्राण असलेला कृषी व्यवसाय तंदुरुस्त झाला पाहिजे. त्यासाठी कृषीप्रधान देशातील काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी व सामाजिक धार्मिक कार्य करणारी झुंजार नेतृत्व काळुस गावचे सुपुत्र श्री. भिवाजी किसन जाचक विविध विकास सोसायटी माजी चेअरमन व माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अस्टर फुलाची लागवड करून कृषी क्षेत्रामध्ये आगळे वेगळे स्थान निर्माण केले अनेक शेतकरी बांधवांनी याकडे लक्ष दिल्यास आपली शेती व आपला गाव सुजलाम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.काळुस गावच्या विविध विकास सोसायटी विद्यमान महिला चेअरमन सौ.जयश्रीताई शंकरराव जाचक,सौ.मंगल ताई भिवाजी जाचक,सौ.शितल सत्यवान जाचक,सौ.मंदा सुभाष जाचक,निलेश हिरामण जाचक,कुमारी संचिता सत्यवान जाचक व काळुस गावच्या महिला भगिनी नागपंचमी निमित्ताने उपस्थित होत्या
