बातमीपत्र

शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत जबरी चोरी करणारे आरोपींना अटक एक लाख एकुणेशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले.मोबाईल चोरीचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी भेट देऊन सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामधील फुटेज पाहिले आणि तपास सुरू केला सदरचे इसम हे आरसीएफ परिसरात राहत असलेले सराईत गुन्हेगार असल्याची गुप्त माहिती पथकास मिळाली त्यानुसार सदर मार्गावरती पोलीस पथकाने पाळत ठेवली असता त्यांना दोन इसम संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले १) अर्जुन कुमार इंद्रासन चौधरी वय वर्ष २१,धंदा गारमेंट राहणार बिल्डिंग नंबर ७२,रूम नंबर ६०९,६वा माळा म्हाडा बिल्डिंग माहुलगाव मुंबई व २)अब्दुल वाहिद अब्दुल माझिद शहा वय वर्ष १७ धंदा नाही,राहणार माहुलगाव यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर नमूद गुन्हा दाखल करण्यात आला.सदर आरोपींच्या घराची झडती घेतल्यानंतर १८ विविध कंपन्यांचे मोबाईल,१ मॉनिटर सीपीयू कीबोर्ड असे एकूण किंमतअंदाजे १,८९,000 /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त,बंदर परिमंडळ श्रीमती गीता चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक्त वडाळा विभाग श्री सुशील कांबळे व पोलीस निरीक्षक श्री मनोज सैद्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंग खुळे,तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोरे,पो.ह.सूर्यवंशी,पो.ह.मुजावर,पो.ह.देशमुख,पोलीस शिपाई आठरे यांनी तपास करून आरोपींना अटक केले


आमच्यात सामील व्हा