रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रतिभावंत कवी व ज्यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,कला,साहित्यिक व राजकीय क्षेत्राबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र /भारत या साहित्यिक संस्थेचे कायदेशीर सल्लागार डॉ.ॲड. संतोष सावंत यांना जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा "छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३"जाहीर करण्यात आला आहे. डॉ. ॲड संतोष सावंत यांना या आधी १) मैत्री युवा गौरव पुरस्कार २००६ , मैत्री संस्था, मुंबई २) समाज गौरव पुरस्कार २००६ , श्री रेणुका देवी सेवा संस्था (रजि) , मुंबई ३)समाजभूषण पुरस्कार : सन्मान प्रतिष्ठान (रजि) मुंबई ४)"राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार" विश्व समता कला मंच - लोवले, रत्नागिरी. ५)डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार - शिक्षण संवेदन , अनुराग प्रकाशन, कल्याण ६) महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार २०२२ - शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद ७) साहित्य वाचन पोज पुरस्कार, साहित्य सेवा प्रज्ञा मंच, कल्याण. अशा पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे तसेच त्यांचा "काव्यांकुर" हा कविता संग्रह तसेच शोधक माहिती चा संग्रह असणाऱ्या "शोध युगाचा" या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे. औरंगाबाद, येथील जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा "छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३" यंदा मुंबईच्या डॉ अँड संतोष सावंत यांना जाहीर करण्यात आला आला आहे.सामाजिक, धार्मिक, कवी, साहित्यिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटविनाऱ्या डॉ संतोष सावंत यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
