बातमीपत्र

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे वरळी विधानसभेतील नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा स्नेहसंमेलन व मार्गदर्शक मेळावा तेली समाज सेवा कार्यालय,शंकरराव नरम पथ लोअर परेल मुंबई येथे पर पडला या कार्यक्रमाचे आयोजन वरळी विधानसभा समन्वयक श्री. प्रशांत गवस व वरळी विधानसभा संघटक श्री.संजय गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमाला दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ११ चे विभागप्रमुख उपनेते मा. श्री.यशवंत जाधव साहेब व महाराष्ट्र सचिव तसेच सिने कलाकार श्री.सुशांत शेलार यांनी मार्गदर्शन केले नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाल व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम कशापद्धतीने केले पाहिजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहचलो पाहिजे यासाठी सर्वांनी कोणतेहे हेवेदावे न ठेवता काम केले पाहिजे असे वक्तव्य वरिष्ठ नेत्यांनी केले. वरळी विधानसभा संघटक संजय गायकवाड यांनी आपले अनुभव सांगत कार्यकर्ता संघटन कसे वाढवावे याचे मार्गदर्शन केले वरळी विधानसभा समन्वयक श्री. प्रशांत गवस यांनी मार्गदर्शन करताना वरळी विधानसभेचा संपूर्ण आढावा घेत कार्यकर्त्यांनी प्रोटोकोल पाळून शिस्तप्रिय पद्धतीने जनतेचे प्रश्न सर्वसामान्याना असणाऱ्या समस्यांचे निराकारण कसे करावे याची माहिती दिली तसेच शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वरळी विधानसभेतील प्रश्न मार्गी लावण्याकरिता आपण अग्रेसर असले पाहिजे असे वक्तव्य केले.त्याच बरोबर वरळीतील रखडलेले एस आर ए प्रकल्प त्यामधील रहिवाशांना होणारी गैरसोय व असलेल्या अनेक समस्या याकरिता शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.वरळीतील नवनिर्वाचित पदाधिकारीयांची नियुक्ती होऊन एक आठवडाहि न होता हा मेळावा घेऊन मोठ्या जोशात कामला सुरुवात करणारे व नियोजन बद्द काम कसे करता येईल याचा आराखडा घेऊन काम करणारे वरळी विधानसभा समन्वयक श्री. प्रशांत गवस यांचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व वरिष्ठ नेत्यांनी सुभेछ्या देऊन आभार व्यक्त केले.


आमच्यात सामील व्हा