बातमीपत्र

पवित्र श्रावण महिन्यात परमपुरुष भगवान श्री स्वामीनारायण जी यांना एका खास स्क्रीन प्रकारातील आकर्षक झुला (हिंडोला) मध्ये सजवले जाते.हे दृश्य अतिशय आकर्षक आहे.देश-विदेशातून असंख्य भाविक परमेश्वराच्या दर्शनासाठी येतात.श्री स्वामीनारायण गादी संस्थान महालक्ष्मी मुंबई येथे गुरुवर्य श्री मुक्तजीवन स्वामीबापा,श्री पुरुषोत्तमप्रिय स्वामीजी महाराज आणि आचार्य श्री जितेंद्रियप्रिय दासजी स्वामीजी महाराज,भारतातील आणि जगातील सर्व मंदिरातील संत आणि भक्तांच्या आशीर्वादाने हा उत्सव संपूर्ण उत्साहात आणि प्रेमाने साजरा केला जातो.मुंबई मध्ये स्वामीनारायण गादी संस्थान मंदिराचे हे 34 वे वर्ष आहे त्या निमित्ताने विशेष आकर्षण म्हणून या महोत्सवाला ३४ लाख रुपयांहून अधिक नोटांनी देवाला सजवण्यात आले हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत एक अद्भूत मोहक दर्शन घेण्याकरिता यावे असे आव्हान करण्यात आले.स्वामीनारायण मंदिर या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये आरोग्य विषयी लागणारी गरजूना मदत करणे,गरजू गरीब मुलामुलींना शालेय शिक्षणाकरिता मदत तसेच अन्नधान्य वाटप सारखे अनेक उपक्रम राबवत असताना कोविद सारख्या महामारीत मुंबई महानगर पालिकेसोबत पहिले कोविद सेंटर उभारून रुग्णांना सर्वतोपरी मदत केली तसेच शासकीय अधिकारी यांना संस्थांच्या धर्मशाळेत कोविड काळात राहण्याची व्यवस्था करून दिली अशे अनेक उपक्रम स्वामीनारायण गादी संस्थान महालक्ष्मी मुंबई तसेच जगभरातील स्वामीनारायण संस्था हे अशे उपक्रम राबवत असतात.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा