संगम नगर व भरणी नाका ते वडाळा रेल्वे स्थानक मार्गावर शेअर टॅक्सी चालकांमुळे वारंवार होत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे या शेअर टॅक्सी बंद करण्यासाठी दि . २६ /०७/२०२३ रोजी दुपारी ४ वाजता बांसुरी बार जवळ, वडाळा (पूर्व ), मुंबई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,वडाळा पुर्व या ठिकाणी शेअर टॅक्सी विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाचे आयोजन शिवसेना, मनसे,कॉंग्रेस,भाजपा,आप,स्वारिप,युथ रिपब्लिकन,आरपीआय,वंचित या सर्वच पक्षाने केले होते. या मोर्चास जनतेने ही भरपाऊसात चांगला प्रतिसाद दिला.तर वडाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी सदर आरोपीस अटक केली असुन त्यास ७ दिवसाची न्यायलयीन कोठडी दिल्याचे तसेच आरटीओ ला टॅक्सी स्टॅंड बंद करण्यासंदर्भात पत्र देणार असल्याचे सांगितले.वडाळा पुर्व विभागात चालणारया शेरींग टॅक्सी वाल्यांने दोन दिवसापुर्वी अर्चना गुरव व मनिषा जामकर या दोन घरकाम करणारया महिलांना उडवल होत. त्या दोघीही सध्या केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
