भारत: क्वुटॉन भारतातल्या टाईल उद्योगातल्या आजच्या आघाडीच्या ब्रॅंडने परत एकदा चमत्कार करून दाखवला आहे. आपल्या महाकाय संशोधन आणि विकास विभागाच्या बळावर कंपनीने एक संपूर्ण नवीन, याआधी कधीही बघायला न मिळालेली अशी उत्पादन श्रेणी 12फूट x 4 फूटया आकारात सादर केली आहे, जिचे नाव आय मार्बल असे आहे. आजवर जगात कोणीही बघितले नसेल किंवा ज्याची कल्पना सुद्धा केली नसेल असे हे उत्पादन आहे.
कंपनीचे सी.एम.डी.श्री.मनोज अगरवाल यांना इतर सन्माननीय संचालकांसह भारतातील टाईल उद्योगात क्रांतीघडवून आणण्यास सज्ज झालेया या श्रेणीचे उद्घाटन करताना अतिशय अत्यानंद आणि अभिमान वाटत होता आणि त्याच बरोबर चयाद्वारे पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी होणे हेत्यांना आपले सौभाग्य वाटत आहे.गुजरात मधील आपल्या अत्याधुनिक, अशा प्रकारचा जगातील पहिलाच असणार्या, युरोपिअन तंत्रज्ञावर आधारित कारखान्यात कंपनीया श्रेणीचे उत्पादन करणार आहे.
आय मार्बल पातळ स्लॅबची वैशिष्ट्ये : 1200x3000, 6एम एम जाडी
• जलरोधक दर्जा:-पाणी शोषून घेणे जवळ जवळ अस्तित्वात नाही - बुरशी आणि शेवाळ तयार होण्यास प्रतिबंध करतो.
• वाकण्यास विरोधी ताकद:-उच्चताण बलस्तर - आकार देण्यास आणि फर्निचर, सिंक्स, टेबलटॉप्स, आणि इतर विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यास सुलभ.
• झीज प्रतिबंधक:-झीज होण्यास आणि चरेपडण्यास उच्चप्रतिरोध (फक्त पॉलिशफिनिशवगळता)
• सूर्यप्रकाशा विरुद्ध प्रतिकारशक्ती:-अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणां चारंगाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. उघड्यावरच्या वापरासाठी उपयुक्त.
• डागां विरुद्ध प्रतिकारशक्ती:-सच्छिद्रता नसणारा पृष्ठ्भाग. डाग पृष्ठ्भागावरच राहतातआणि ते काढून टाकणे सुलभ- देखभालीचा खर्च कमी.
• रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती:-द्रावणे, जंतूनाशके, साबण, ब्लीच किंवा अमोनिया, कमी तीव्रतेची आम्ले आणि अल्कलीयांसारख्या रासायनिक सफाई पदार्थां विरुद्ध तसेच जलतरण तलावात वापरल्या जाणार्या क्षारांविरुद्ध प्रतिकारशक्ती.
• आग प्रतिकारशक्ती:-धूर किंवा विषारीपदार्थ बाहेर टाकत नाही- व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी सुरक्षित.
• हिम प्रतिकारशक्ती:-गोठवून टाकणार्या तीव्र तापमानांविरुद्ध उच्चप्रतिकारशक्ती - हवामानापासून सुरक्षित, अतितीव्र थंड वातवरणासाठीउपयुक्त.
• उष्ण्तेच्या झटक्या विरुद्ध प्रतिकारशक्ती:-तापमानात अचानक होणर्या बदलांविरुद्ध प्रतिकारशक्ती. हवामाना पासून सुरक्षित,उच्चउष्ण तापमानाला उपयुक्त
• साफकरण्यास सुलभ:-नैसर्गिक मार्बल सारखी विशेष सफाई पदार्थांची गरज नाही. -देखभाल कमी खर्चात आणि सुलभपणे.
• निरंतरता जैविक विघटन आणि पुनःप्रक्रियासहज होत असल्याने पर्यावरण पूरक:- हिरव्या आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणाला समर्थक.
• वजनाला हलका पृष्ठभागांवर अचलभारकमीहोतो- इमारतीचे आयुष्यमान वाढते.
• मोठ्या आकारात उपलब्ध:-बसविणे सुलभ- मोठ्या जागा सांधेविरहित पणे व्यापतो. डिझाईन्स व ग्राफिक्सची सलग दृष्यमानता, पृष्ठ भागावरील दोष आणि उंच सखलपणा टाळता येतो. भव्यता आणि सुडौलपणात भरघालतो.
• पातळटाइल्स:-भिंती फलक आणि भिंतींच्यासौंदर्यीकरणासाठी, भिंतींचे आवरण टेबल टॉप्सयांसाठी उपयुक्त.
• उच्चलवचिकता:-ताकद आणि कणखरपणात वाढ करतो. भिंतींवर तसेच जमिनीवर बसवण्यास सुलभ. पृष्ठभगावरील लहान खाचखळग्यांना पुरून उरतोत्यामुळे पृष्ठ्भागाची दृश्यमानता निर्दोष आणि स्खलन विरहितहोते.
• आरोग्यदायी पदार्थ :-धोकादायक पदार्थबाहेर पडत नाहीत /टाकले जात नाहीत - सर्व सजीवांच्या आणि अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास सुरक्षित.
• ध्वनिनिरोधन:-मोठ्या आकारमानाचे सांधे विरहितपृष्ठ,सलग जोडणी,सांध्यां मधल्या फटीकमी,यामुळे ध्वनिनिरोधन वाढते. यामुळे कॉन्फरन्स कक्ष, भोजनकक्ष, आणि इतर मोठी संमेलने होणर्या भव्यदालनांसाठी उपयुक्त.
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
Follow Us On Social Media
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची
