पिपंरी ता.खुलताबाद जि.औरंगाबाद येथे सामाजिक वनिकरण योजेणे अतंर्गत लागवड आधिकारी वनपाल आधिकारी यांच्या वतीने गलेबोरगाव भाग 1 मध्ये बोरगाव ते तिसगाव येथे 72०० वृक्ष लागवड करून त्यांना जतन करण्याचा उपक्रम सामाजिक वनिकरण योजणे अतंर्गत केला आहे या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी स्वतः लागवड आधिकारीयांनी केली व पहारेकरीयाना वृक्षाचे जतन हे वृक्षामिञा प्रमाणे करा असे मार्गदर्शन केले व वृक्ष लागवडीचे प्रयोग चांगल्या पद्धतीने करूण दाखवले.पाणी झिरपून वृक्षराचे जतन कसे करायचे याचा प्रयोग करून दाखवला व याद्वारे झाडे लावा ! झाडे जगवा ! असा संदेश त्यांनी दिला.
