शासनाच्या निर्णय नुसार मोबाईल कंपन्यांचे टॉवर हे शाळा कॉलेज किंवा हॉस्पिटल यांच्या इमारतीवर लावू नयेत असे असताना देखील मुंबई मधील आंध्र एजुकेशन सोसायटीची शाळा वडाळा येथे आहे गेली कित्येक वर्ष शासनाच्या निदर्शनास आणून देखील मनपा प्रशासन या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे मुंबई महानगर पालिका आयुका यांनी मोबाईल टॉवर काढून टाकण्याचे आदेश सहायक पालिका आयुका एफ-उत्तर या कार्यालयाला दिले परंतु त्या आदेशावर कोणतीही कारवाई झाली नाही.आंध्र शाळेकडे मोबाईल टॉवर लावण्यासाठी शासकीय कोणतेही परवाने घेतल्याचे आढळत नाही परंतु स्वतःच्या फायद्यासाठी हि शाळा चिमुकल्या देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांच्या आरोग्यासोबत खेळात असल्याचे चित्र दिसत आहे.या शाळेचे संचालक मंडळ फार मुजोर पणे उत्तर देताना पाहायला मिळाले हेलपिंग हॅन्ड या संस्थेने केलेल्या आंदोलनाचा पाठपुरावा स्थानिक पोलीस स्टेशन करणार असल्याची माहिती संस्था चालकांनी दिली.
