बातमीपत्र

शेख शकील इब्राहिम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 जाहीर

जिंतूर तालुक्यातील आङगाव (बाजार) येथील मराठी माध्यमाचे महात्मा गांधी विद्यालय येथील कार्यरत सह शिक्षक शेख शकील इब्राहिम यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभाग आणि श्रीवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय बाबी, नवीन उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल विभागस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 जाहीर झाला आहे.येत्या 30 सप्टेंबरला बीड येथे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व मंत्री जयदत्त क्षीरसागर,मोरेश्वर सावे,खासदार प्रीतम मुंडे,वैधानिक विकास मंडळाचे  अध्यक्ष डॉ.भागवत कराड,खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचे उपस्थितीत वितरण होणार आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सय्यद हकीम,आदर्श शिक्षक संघटनेचे नेते के.सी.घुगे,के.ओ.कपाळे,डी.यू.राठोड,सोपान खताळ,सहकारी शिक्षक,गावकरी, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक वर्ग व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


आमच्यात सामील व्हा