परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी क्रमांक-2 येथील अनागोंदी कारभार वारंवार चव्हाट्यावर येत आहे. गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार करूनही वरिष्ठ अधिकार्याकडून मात्र याकडे कानाडोळा करून करत असल्याचे निदर्शनास येत आहे.या पंचक्रोशीत यापासून वैद्यकीय दवाखान्या अंतर्गत पंचक्रोशीतील जोगवाडा,सोस, सोनापुर, गारखेडा, पांढरगळा, भांबरी, सावरगाव, राजेगाव, माणकेश्वर अशी बहुतांश खेडी या जोगवाडा पशुवैद्यकीय दवाखाना यावर अवलंबून आहेत मात्र, या दवाखान्यात डॉक्टर तसेच सेवक कुणीच उपस्थित नसल्याने अनेक पशुपालकांची व शेतकर्यांची हेळसांड होत आहे. पुन्हा एकदा यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
