बातमीपत्र

शेल्टर ऑफ पीस फाउंडेशन ही सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून.आत्तापर्यंत जवळ जवळ २५० ते ३०० गरजवंताना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य केले आहे.तसेच कँसर,HIV,कणी Replacement सारखे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना मदतनिधी देऊन अथवा संपूर्ण ऑपरेशन विनामूल्य करून मदत करत आहे.राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून गरजूंना मदतीचा हात पुढे करत आहे.ग्रामीण भागातही शेतकरी वर्गाला मदत पुरवण्याचे कार्य करत आहे.शैक्षणिक क्षेत्रातही शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे त्यांच्या वतीने ३५ विद्यार्थाना दत्तक घेण्यात आले या ३५ विद्यार्थ्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च या संस्थेने करण्याचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थाना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या वेळी अध्यक्ष संतोष दाभोलकर,सचिव राजेश हळदणकर आदर्श सेवा समितीचे सचिव शशिकांत राऊत,शाळेच्या मुख्यध्यापिका मेघा जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या