आज लंडन येथील विम्बले महानगरपालिकेचे माजी महापौर भगवानजी चोहोन व त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांची सदिच्छा भेट घेतली. सदर भेटीमध्ये मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण आणि अनेक आरोग्य विषयक अनेक प्रगतीशील कार्याबद्दल शिष्टमंडाळाने मुंबई महापौरांचे अभिनंदन केले. लंडन येथील समाजसेवी संस्था मुंबईतील महापालिकेच्या शाळा व आरोग्य केंद्रे दत्तक घेण्याबाबतची इच्छा शिष्टमंडळाने व्यक्त केली. छत्रपतीं शिवाजी महाराज की जय ह्या नाम घोषाने लंडनमध्येही स्फुरण चढते आणि छत्रपतींचा इतिहास अधिकाधिक सातासमुद्रापार पसरवण्यासाठी शिष्टमंडळ प्रयत्नशील असल्याबाबत मुंबई हाऊसिंग फेडरेशन तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी सांगितले.
