कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेक घर आणि कुटुंब उध्वस्त झाली आणि एक मोठ संकट महाराष्ट्रावर आल,अनेक वाडे,वस्त्या,घर पाण्याखाली गेली हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले अनेक कुटुंब रस्त्यावर आले,पशुधनाची हि मोठी हानी झाली अश्या परिस्थिती मध्ये आपण समाजच काही देन लागतो.या निर्मळ भावनेने किर्ला येथिल समस्त गावकरी , ग्रामपंचायत,जिल्ह्या परिषद शाळा,लाल बहादूर शास्त्री विद्यालय यानी पुढाकार घेऊन गावातून मदत फेरी काढत मदत संकलन केले यात नागरिकांनी जमेल तशी मदत केली या वेळी उस्फूर्त पणे सर्व गावकरी यांनी यात प्रामुख्याने संस्क्रुती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल खंदारे,सरपंच शेषराव राठोड,वाघ सर,केंद्र प्रमूख कांबळे,मुख्याध्यापक खरात यांच्या सह विध्यार्थी आणि गावकरी यांनी पुढाकार घेतला.
