बातमीपत्र

विनायक राऊत संसदेतील प्रभावी खासदारांमध्ये अव्वल ! देशातील प्रभावी खासदारांमध्ये लोकसभा दणदणून टाकणारे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सन्मा. विनायक भाई राऊत यांचा अव्वल क्रमांक !

विनायक राऊत संसदेतील प्रभावी खासदारांमध्ये अव्वल ! देशातील प्रभावी खासदारांमध्ये लोकसभा दणदणून टाकणारे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सन्मा. विनायक भाई राऊत यांचा अव्वल क्रमांक ! मध्यप्रदेशातील फेम इंडिया ह्या एशिया पोस्टने केलेल्या सर्व्हेमध्ये देशातील 25 खासदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणाचा आवाज लोकसभेमध्ये पोहोचवणारे खा. विनायक राऊत यांची कामगिरी अव्वल असल्याचा निर्वाळा फेम इंडियाच्या पोस्टमध्ये दिसून आला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने आणि प्रभावी वक्तृत्वाने सर्व लोकसभा सदस्यांची मने श्री राऊत यांनी जिंकली आहेत. अतिशय प्रभावी वक्तृत्व आणि संविधानिक बाबींचा सखोल अभ्यास ह्या गुणांमुळे खा. विनायक राऊत नेहमीच संसदीय कामात अग्रेसर असल्याबाबत सहकारी खासदार सांगतात. कोकणातील विकासाबाबतच्या अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर सभागृहास विविध प्रश्न विचारून कोकणातील जनतेस खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न खा. विनायक राऊत यांनी केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी आवर्जून सांगितले. नम्र स्वभाव आणि सहजतेने उपलब्धता ह्या वैशिष्टयांमुळे विनायक राऊत फक्त मतदारसंघातच नाही तर मतदार संघाबाहेर राहणाऱ्या चाकरमान्यांमध्ये देखील आपल्या कार्याचा ठसा कायम उमटवत असतात. त्याचीच पोचपावती म्हणून संसदेत अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी समस्त कोकणातील चाकरमान्यांतर्फे खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले व अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा