खळेगाव येथील बाबाराव महादू मुंडे यांचे मालकीचे हॉटेल किनारा हे खळेगाव ते शेंदुर्जन रोडवरील त्यांच्या स्वतःच्या शेतातील गट नंबर 83 मधे खळेगाव पासून 500 मीटर अंतरावर आहे. सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता ते स्वतः हॉटेल बंद करून घरी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता हॉटेल उघडण्यास गेले असता त्यांना हॉटेल समोर अंधार दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हॉटेलमधील असलेल्या पाच खाटा पैकी दोन खाटा तिथे नव्हत्या तर तीन खाटांच्या दोऱ्या धारदार वस्तू ने कापलेल्या होत्या तर हॉटेल परिसरात लावलेली एलईडी लाईटांच्या काचा व लाईट फुटून खाली पडलेले होते. स्थानिकांच्या सांगण्यावरून रात्री एक वाजेपर्यंत लाईट चालू होते. म्हणजे रात्री दोन ते सकाळी पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने हे खोडसाळ कृत्य केल्याचा अंदाज आहे. याबाबत बाबुराव मुंडे यांनी बिबी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती बाबद गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार शेख असिफ हे करीत आहेत.
