बातमीपत्र

नागरिक घराबाहेर पडू नयेत म्हणून मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनची आक्रमक भूमिका

भांडुपमध्ये तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी घेतली संस्था तपासणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गृहनिर्माण सोसायट्यांना रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी इमारतींच्या आवारातच जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याचे आदेश सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबत सोसायटीतील क्लब हाउस स्विमिंग पूल अशी सार्वजनिक ठिकाणं बंद करून नागरिक घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी घेण्याचे तसेच सोसायटीच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपनगरांतील सोसायट्यांमध्ये नागरिकांना सेल्फ कोरन्टाईन करण्यासाठीच्या उपाययोजना मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनच्या संचालकांनी राबवायला सुरुवात केली आहे. अशाच एका कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता भांडुपच्या ड्रीम्स रेसिडेन्सी मध्ये पदाधिकाऱ्यांकडून उपाययोजना करण्यात आल्या असल्याबाबतचे प्रकर्षाने जाणवले. संचालक विशाल कडणे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरणाची मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॉम्प्लेक्समध्ये सुरु केली असून त्याच्या कार्याचा अहवाल स्वतः फेडरेशन संचालक घेत आहेत. त्याबाबत काही सुधारणा असल्यास फेडरेशन अध्यक्ष प्रकाश दरेकर स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनास वेळोवेळी सूचना करत आहेत. गृहनिर्माण संस्था संकुलाच्या कोणत्याही सदस्यांला बाहेर जायला लागू नये अशा अनेक उपाययोजना संकुलामध्येच करून देण्यास फेडरेशन संचालक आग्रही आहेत. भांडुप येथे पदाधिकाऱ्यांकडून भाजीपाल्याची सोय करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. सोबतच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात अशा स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन लॉक डाऊनच्या काळापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत कि नाही याबाबतचा पाठपुरावा मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विशाल कडणे जातीने घेत आहेत. यासोबतच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय खबरदार्‍या घ्याव्या यासाठी सूचना फलक लावण्यासाठी संचालक विशाल कडणे यांनी एक सूची जारी केली असून त्याची अंमलबजावणी संपूर्ण मुंबईमध्ये होण्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्वच कार्यकर्ते आग्रही आहेत. एकंदरीतच कोरोना प्रादुर्भाव पळवून लावण्यासाठी आता प्रशासनाबरोबरच मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनने कंबर कसली आहे आणि सर्व गृहनिर्माण सदस्यांनी त्याचे पालन करावे अशी विनंती फेडरेशन संचालक विशाल कडणे यांनी समस्त गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांना केली आहे


आमच्यात सामील व्हा