जुन्या वादाच्या संशयावरून शिरोली येथे खापरदरा हरण डोंगरावर दुहेरी हत्याकांड घडला अज्ञात आरोपीनी दोन अज्ञात इसमाचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केला अशी फिर्याद मिळताच पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला त्यामध्ये मयत निरंजन गुरव वय २० वर्ष रा. पिंपळे ता. हवेली जिल्हा पुणे व बजरंग जाधव वय २२ रा. वैदवस्ती पिंपळे गुरव यांची नावे निष्पन्न करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध लावला मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आरोपीना शोधण्यासाठी मा.संदीप पाटील पोलीसअधीक्षक,मा. विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे,मा.गजानन टोम्पे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तासांच्या आत पथके तयार करून कुशलते माहिती काढून संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणला.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गुरव व सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.लाड हे करीत आहेत
