बातमीपत्र

देवा श्री गणेशा मालिकेमध्ये अभिनेत्री प्रिया गमरे साकारतेय भयावह शतमहिषीअसुर

प्रतिनिधी - गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश भक्तांसाठी स्टार प्रवाह वाहिनीवर देवा श्री गणेशा हि मालिका विशेष सुरु करण्यात आली आहे. या मालिकेमध्ये गणपती बाप्पांच्या जन्मा पासून ते त्यांच्या विविध गुणांचे, कलांचे, पराक्रमांचे उत्तम प्रदर्शन करण्यात आले आहे. मालिकेमध्ये भांडुपचा दिवेश मेदगे, देवयानी फेम भाग्यश्री मोते इत्यादी गुणवंत कलाकार असून विशेष म्हणजे आपल्या ऍक्शन सीन्सने थरकाप उडवून देणारी आणि बॉलिवूडमध्ये कंगना राणावत यांच्यासोबत मणिकर्णिका सिनेमामध्ये भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकलेली मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया गमरे भयावह शतमहिषीअसुर या महिला भूमिकेमध्ये दिसणार आहे. प्रियाने साकारलेली अतिशय गंभीर आणि भयावह अशी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून प्रेक्षकांनी सदर भूमिकेचे कौतुक केले आहे. याबाबतीत प्रिया गमरे यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता त्यांनी अतिशय नम्रपणे सर्व प्रेक्षक वर्गाचे आभार मानले आहेत आणि मालिकेची संपूर्ण शृंखला अशीच अतिशय मनोरंजक असल्याचे सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा