बातमीपत्र

माझ्या 52 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्यापेक्षा रक्तदान करून मला शुभेच्छा द्या - वि. प. नेते प्रवीण दरेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखत माझा वाढदिवस साजरा करावा. वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना ग्रस्तांना शक्य तितकी मदत करावी. माझ्या 52 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्यापेक्षा रक्तदान करून मला शुभेच्छा द्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. गेले सहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा झंझावती दौरा करून सत्ताधाऱ्याना घाम फोडणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी त्यांचा वाढदिवस केक, पुष्पगुछ इत्यादी न आणता कोरोना ग्रस्तांना आवश्यक ते आरोग्यदायी मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामुळे समाजामध्ये एक प्रकारे सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण झाले असून त्यामुळे कोरोनाग्रस्त बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे अशी भावना दरेकरांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा