राजगुरुनगर येथे स्वर्गीय सुखलाल खाबीया जैन धर्मार्थ हॉस्पिटलच्या हालगर्जी पणामुळे महिंन्द्र अशोक नगरकर २४ वर्षीय युवकाचा मृत्यु २८/११/२०२० रोजी झाला.युवकाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी याकरिता आर.पी. आय. आठवले गटाच्या वतीने २७/०१/२०२१ रोजी डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर संतोषनाना डोळस,हरिश देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन सुरु करण्यात आले महिंन्द्र अशोक नगरकर २४ वर्षीय युवकाचा मृत्यूला दोन महिने पालटले तरी शासकीय यंत्रणेतून कारवाई होत नाही अशी त्यांच्या पालकांनी आपली व्यथा आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना मांडली.त्यावेळी आप्पा कडलग,पी. के.पवार,सचिन अंकुश,संजय खंडागळे,रंजना रोकडे,शिनाताई छाजेड,आण्णा शितोळे,संजय गायकवाड,अशोक लक्ष्मण नगरकर,सुरेखा अशोक नगरकर या पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून आर.पी.आय.च्या वतीने डी. वाय.एस.पी.साहेब यांना निवेदन देण्यात आले.
