बातमीपत्र

देशासह राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे आणि ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावल्याची घटना देखील समोर येत आहेत.अशा परिस्थितीमध्ये ऑक्‍सिजन कॉन्स्टेटरच्या सहाय्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील केला जाऊ शकतो हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांसाठी देखील वापरता येतात.याच पार्श्वभूमीवर या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी सध्या वाढते आहे.भांडुप मधील माऊली फाउंडेशन च्या वतीने अशा रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन या पुरविल्या जात आहेत ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे असे रुग्ण या संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधतात आणि त्यानंतर ही संस्था ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे अनेक समाजसेवी व्यक्तींकडून या संस्थेला देण्यात आलेले आहेत.ते या रुग्णांपर्यंत पोहोचविले जातात आतापर्यंत असे १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या संस्थेकडे उपलब्ध आहेत आणि ते गरजू रुग्णांना पर्यंत पोहोचविण्यासाठी या संस्थेने एक ऑक्सिजन व्हॅन देखील तयार केली आहे.या संस्थेच्या कामगिरीमुळे अनेक गरजू रुग्णांना याचा दिलासा मिळाला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा