बातमीपत्र

मनसे नेते, अमित राज ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त २४ मे रोजी, स्माईली इन्फिनिटी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. हरिनाक्षी मोहन चिराथ यांच्या संकल्पनेतून  व  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११० चे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांच्या वतीने,गोरगरीब कष्टकरी मजूर कामगार, 'विधवा महिला, नाका कामगार,व आर्थिक दृष्ट्या मागासलेले" अश्या ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या (धान्याचे)  किट" चे वाटप आज करण्यात आले .
भांडुप पश्चिमेच्या व्हिलेज रोड येथील कूकरेजा कॉम्प्लेक्स येथील शाखेसमोर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, स्माईली इन्फिनिटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा हरीनाक्षी मोहन चिराथ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मोहन चि राथ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. मास्क लावून सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा