बातमीपत्र

आमदार, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या शौचालय कामाचा लोकार्पण सोहळा

भांडूप पश्चिम येथील ईश्वर नगर येथील पाटील भवन चाळ येथे आमदार, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या शौचालय कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर लोकार्पण सोहळ्यास आमदार आणि ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख रमेश  कोरगावकर, नगरसेवक उमेश माने, नगरसेविका सौ.दिपमाला  बडे, नगरसेविका सौ.दिपाली गोसावी, उपविभागप्रमुख  सुरेश शिंदे आणि सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होत्या.शौचालयाचं काम  वेगाने सुरू करून परिसरात हजारांवर लोकसंख्या असल्यामुळे नागरिकांना  शौचालयांची गरज होती. यामध्ये पुरुषांसाठी व महिलासाठी शौचालये बांधण्यात आली आहेत.मात्र नगरसेवक आमदार रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली  नवीन शौचालयाचं काम वेळेत पूर्ण केल्यानंतर नागरीकांनी  समाधान व्यक्त केले आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा