सह्याद्रीच्या कपारीमध्ये भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र निमगाव खंडोबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आदर्श ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री.सिताराम तुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सौ.सुनंदाताई तुकाराम भोंडवे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.श्यामल संभाजी शिंदे,श्री.संतोष काळूराम शिंदे,श्री.बाळासाहेब शिंदे,श्री.दिलीप धोंडीबा भगत,श्री.हर्षवर्धन मोहन शिंदे,श्री.विजय बाळू जाधव,सौ.रुपाली महिंद्र काळे,सौ शुभांगी बाळासाहेब भालेकर,सौ बबडाताई नथू भालेराव व सर्व निमगाव चे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी खंबीर नेतृत्व जबरदस्त कर्तुत्व उत्तम वक्तृत्व युवकांचे आशास्थान माननीय विजय भाऊ शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.बबन जगन्नाथ शिंदे अध्यक्ष,अमर भाऊ शिंदे,तुकाराम शिंदे,माजी सरपंच युवराज अण्णा राजाराम शिंदे,बबन नामदेव शिंदे,माजी सरपंच व महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.श्री खंडू नारायण खैरे ग्रामसेवक,संपत आनंदा तांबे लिपिक,वंदना मिलिंद सोनवणे संगणक परिचालक,श्री बाळासाहेब दादा भाऊ सोनवणे शिपाई,मयूर सुरेश चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रिया वेळी सहभाग घेतला.
