पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत दादा पाटील यांच्या सुचनेनुसार व सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.यावेळी सरपंच परिषदेच्या पदाधिकार्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.त्यांनी नवीन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्राची कैलास लिंभोरे,पुणे जिल्हा अध्यक्षपदी उज्ज्वला सुरेश गोकुळे,जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक अर्जुन वीर,खेड तालुका अध्यक्षपदी सचिन देवकर,कार्याध्यक्षपदी अमृत ठोंबरे,उपाध्यक्षपदी अक्षय पडवळ,सरचिटणीसपदी विशाल काशिद,तालुकासंघटकपदी अमित चौधरी,प्रसिद्धीप्रमुखपदी महेंद्र कोळेकर, सल्लागारपदी किरण पडवळ,सचिवपदी गणेश कोळेकर,उपाध्यक्षपदी वैशाली कोहिनकर,सरचिटणीसपदी कल्याणी ठाकुर,संघटकपदी अनिता मांजरे यांची निवड करण्यात आली.यावेळी चिंचोशी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समिती खेड सभापती गव्हाणे मॅडम यांनी उज्वला ताई सुरेशराव गोकुळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
