खेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी खुनाच्या गुन्ह्याची १२ तासाच्या आत उकल करून आरोपीला केले जेरबंद दिनांक १५.१२.२०२१ रोजी रात्री खरपुडी बुद्रुक गावाच्या हद्दीत माथेरान हॉटेल समोर रामदास सोपान थिटे वय २७ वर्ष व त्याचा मावस भाऊ दत्तात्रय रामदास टाकळकर राहणार रेटवडी ता.खेड यांना अज्ञात इसमाने मारहाण केल्याचे काळातच पोलिस पथक घटना स्थळी पोहचले व तपासाची सुरुवात झाली.सदरचा गुन्हा हा नितीन काळूराम काशीद वय वर्ष 47 राहणार खरपुडी बुद्रुक याने केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तो पळून जात असताना त्याला अटक केली.सदरचा गुन्हा हा दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून घडल्याचे तपासात निष्पन्न झाले.
