बातमीपत्र

आनंद पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ पतपेढीच्या मालाड शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी - मालाडकरांना नवीन वास्तूमध्ये संपूर्ण संगणकीकरण असलेल्या दैवज्ञ पतपेढीची सुसज्ज शाखा देण्याची वचनपूर्ती आज आनंद पेडणेकर यांनी पूर्ण केली. दैवज्ञ पतपेढी गेली ४० वर्षे दैवज्ञ ज्ञाती बांधवांची आर्थिक निकड भागवण्याचा हक्काचा पर्याय असून पतपेढीच्या माध्यमातून प्रत्येक दैवज्ञ बांधवांची आर्थिक 
 गरज पूर्ण करणे हा एकमेव उद्देश्य असल्याचे पतपेढीचे अध्यक्ष आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले. आज मालाड येथे मंगलदिप सोसायटीमध्ये तळमजल्यावर दैवज्ञ सहकारी पतपेढीच्या मालाड शाखेच्या नवीन वास्तूमध्ये पतसंस्थेचा वास्तू प्रवेश झाला. त्यानिमित्ताने उदघाटक म्हणून मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आ. अस्लम शेख उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्थानिंक नगरसेविका योगिता कोळी उपस्थित होत्या. कार्यक्रम दरम्यान समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ पेडणेकर यांच्या अनेक स्मृतींना मान्यवरांना उजाळा दिला. दैवज्ञ समाजासाठी स्व. जगन्नाथ पेडणेकर यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र आनंद पेडणेकर समाजाची सेवा करत असल्याचे पालकमंत्री आ. अस्लम शेख यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मालाड दैवज्ञ समाजाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली. उदघाटन कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक शिरीष देवरुखकर यांनी आपल्या सुस्वर गायकीने उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमास दैवज्ञ समाजाचे समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, सुप्रसिद्ध उद्योजक मोहन म्हाप्रळकर, विजय कडणे,  दैवज्ञ चषक आयोजन समिती अध्यक्ष वैभव भुर्के, प्रसाद खेडेकर, शिवसेना उपविभाग प्रमुख नमिता कल्याणकर, काँग्रेसच्या स्थानिक नेत्या पूजा कारेकर, मालाड दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सर्व दैवज्ञ ज्ञाती बांधव उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा