खेड पोलिस स्टेशन चे कार्यक्षम व कर्तव्य शिल पोलिस हवालदार संतोष घोलप साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड पोलिस स्टेशन कर्तव्यदक्ष गुन्हेगारांचे कर्दनकाळ कायद्याचा वचक शासनाची शान कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी खंबीर नेतृत्व जबरदस्त कर्तुत्व उत्तम वक्तृत्व असे खेड पोलीस स्टेशनचे सतिष कुमार गुरव साहेब यांनी अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने आपले विचार व्यक्त केले.कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी तत्पर असणारा पोलीस आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अडचणीसाठी धावणारा पोलीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा म्हणजेआत्मिक समाधान होय.त्यांना उन्नती व प्रोत्साहन मिळते असे उद्गार खेड पोलिस स्टेशनचे पीआय सतिष कुमार गुरव साहेब यांनी व्यक्त केले. त्यावेळी खेड पोलिस स्टेशनचे एपीआय लाड साहेब,रानगट साहेब,साबळे साहेब,भापकर साहेब,घाटे मॅडम त्याच प्रमाणे सर्व पोलिस कर्मचारी व कानुर गावचे युवा उद्योजक नितीन शेठ घोलप, सचिन तावरे,हरीश भाई देखने अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने उपस्थित होते.
