छोट्याशा गुलाच्या काडीने वणवा भडकला मुक्या प्राण्यांचा जीव गेला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. आगीचे गोळे मुक्या जनावरांपर्यंत आले. काय करावे आणि कुठे जावे मुक्या प्राण्यांना कळाले नाही. हंबरडा फोडून क्षणात संपले सारे. अशीच घटना अहिरे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी 28 /4 /2022 रोजी घडली .बाळू ज्ञानू आहेरकर यांच्या गोठ्याला आग लागून अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडली.त्यावेळी अनेक मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.वआहेरकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा परिषद सदस्य युवा नेतृत्व शरदभाऊ बुट्टे पाटील .पुणे जिल्हा विद्यामान सदस्य बाबाजी शेठ काळे. युवा उद्योजक अतुल भाऊ देशमुख .व अमोल दादा पानमंद यांनी आर्थिक मदत पीडित कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व त्यांनी अनेक दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे की सढळ हाताने पीडित कुटुंबीयांना मदत करा .त्यावेळी अहिरे गावचे माजी सरपंच शांताताई सुरेश आहेरकर. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य वैशालीताई नितीन तांबे. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य. प्रविण प्रभाकर रोकडे. माजी सरपंच अंकुश ज्ञानू तांबे. माजी शिक्षण समिती अध्यक्ष तानाजी नामदेव आहेरकर. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश मनु आहेरकर.श्री संतोष शेठ साबळे सरपंच वाघु. माजी चेअरमन दामू शेठ आहेरकर. भगवान मांजरे ग्रामपंचायत सदस्य. व आर्थिक मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन अहिरे कुटुंब यांना मदत करावे असे आव्हान आहेरेगांवच्या ग्रामस्थांनी केले.मदत करण्याकरिता सत्यवान बाळू आहेरकर खाते क्रमांक 73 500 61 774 या खात्यावर आर्थिक मदत करावी अशी विनंती केली.
