आदर्श गाव गोसासि तालुका खेड जिल्हा पुणे विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गोसासी निवडणूक सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी लागली असून सहकारी सोसायटी हा ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानला जातो.विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होणे अत्यावश्यक व तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या आग्रहाखातर निवडणूक रिंगणात उभा असून टेलीफोन हि निशाणी असल्याचे यावेळी सुनील नागुजी गायकवाड यांनी मुलाखती दरम्यान सांगितले व मतदार राजाने बहुमोल मत देऊन प्रचंड बहुमताने विजय कराल अशी विनंती सर्व आदर्शगाव गोसासी खातेदार बंधू-भगिनींना केली.कनेरसर गावचे मुराबी व्यक्तिमत्व भीमराव दगडू सोनवणे,गोसासी गावचे फकीरराव दामु गायकवाड,सुवर्णा गायकवाड,यशोदा बबन गायकवाड,नंदा काळुराम गायकवाड,छाया सुनिल गायकवाड,सुरेश परशुराम गायकवाड,मानसी प्रणाली गायकवाड व अनुसूचित जाती जमाती उमेदवार सुनील नागू गायकवाड यांनी आपली मुलाखत महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज ला दिली
