बातमीपत्र

राजगुरुनगर सहकारी बँक लि.संचालक मंडळ निवडणूक सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांचा खेडच्या पूर्व भागात प्रचाराचा झंझावती दौरा सुरु असून सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व्यवसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी व बँकेच्या खातेदारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड बहु मताने विजयी करा असे आव्हान राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी विद्यमान अध्यक्ष किरण शेठ आहेर यांनी केले.त्यावेळी माजी विद्यमान संचालक युवा उद्योजक राहुल शेठ तांबे पाटील,विजयाताई शिंदे,राजगुरुनगर सहकार बँकेच्या माजी अध्यक्ष,हेमलता टाकळकर,किरण शेठ मांजरे,पत्रकार राजेंद्र सांडभोर,सतीश नाईकरे,अरुण शेठ थिगळे,सागर पाटोळे,समीर आहेर,दिनेश ओसवाल,संजय सुर्वे सहकार पॅनलच्या माध्यमातून राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक पदाच्या प्रचार दरम्यान उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा