बातमीपत्र

आशानंद रेसिडन्सी मधील सुखी समाधानी व आनंदिमय जीवनशैलीचे वातावरण

 तालुक्याचे आमदार मा. दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेद बाजार समितीचे माजी सभापती श्री. अशोकदादा राक्षे यांच्या मध्यस्तीने आशानंद रेसिडेन्सी प्रमोटर उद्योजक श्री.आनंद राव तांबे आणि त्यांच्या सोसायटीमधील प्लॉट धारकांमध्ये साधक बाधक चर्चा झाली त्यामुळे आपसातील मतभेद व गैरसमज दूर होण्यास मदत झाली.मुख्यता कमी केलेला पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा अशी येथील रहिवाशांची विनंती पूर्वक मुख्य मागणी होती.
प्रमोटर आनंदराव तांबे यांनी संयमी भूमिका घेऊन राहावाशांच्या व अशोकदादा राक्षे यांच्या विनंतीला मान देऊन कामी झालेला पाणी पुरवठा पूर्ववत चालू केला त्यामुळे भरपूर पाणी मिळाल्यामुळे येथील मुख्यता महिला रहिवाशांमध्ये आनंदिमय वातावरण झाले व त्या सर्वांनी प्रमोटर श्री. आनंदराव तांबे यांचे मनापासून आभार मानले    

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा