शिरोली गावच्या ग्रामस्थांनी सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार युवा नेतृत्व उद्योजक श्री संजय देखणे यांची कन्या कु.मुदिता संजय देखणे या कन्येचा केला सन्मान आपल्या शिरोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच पदाची दिली खांद्यावर धुरा. पंचवार्षिक निवडणूक सन. २०२२ ते २०२७ कालावधीसाठी ग्रामपंचायत शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी श्री.जाखमाता परिवर्तन पॅनेलचे लोकनियुक्त सरपंच कुमारी मोदिता संजय देखणे या प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभाच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती खेड सभापती विलासराव रामचंद्र कातोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी चंद्रकांत दादा इंगवले,कैलासराव शंकरराव लिंबोरे,संजय शेठ किसनराव देखणे,सिद्धांत संजय देखणे,सौ मनीषा संजय देखणे,नंदा मल्हारी देखणे,विमल अंकुश व शिरोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
