" तुमच्या कष्टातून घडलो आम्ही,तुमच्या शिकवणीत शिकलो आम्ही,चंदनासमन झिझलात आमच्यासाठी तुम्ही आज आपले वैभव पाहण्यासाठी असता तुम्ही तर धन्य झालो असतो आम्ही !!
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सगळ्यांवर फिरवला मायेचा हात सुखजवळ येताच काळाने फिरवली पाठ जन्मोजन्मी पाहु पप्पा आम्ही तुमची वाट..
विकासाचे मार्गावर संस्कृतीचे माहेरघर असणारे पुणे जिल्ह्याचे उत्तरेकडील वैभवसंपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय आणि याच तालुक्याचे पुर्व भागातील श्री खंडोबाचे पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळ नदीच्या तीरावरती हिरवा शालू नेसून उभे असलेल्या वरुडे गावचे सुपुत्र कै.दत्तात्रय कॄष्णाजी तांबे पाटील रेंजर फोरिस्ट ऑफिससर यांचे निधन.१६.३.२००८.रोजी झाले.त्यांचे ५ वे पुण्यस्मरण निमित्ताने वरूडे येथे सोमवार दिनांक २०.३.२३ सकाळी.९.०० ते ११.०० या वेळेत किर्तनरुपी सेवा सौ.माधुरीताई रोडे इंदोरे यांची होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी तांबे पाटील भाऊ,युवाउदयोजक,महेश दत्तात्रय तांबे पाटील मुलगा,संतोष तांबे,विकास तांबे, पत्नी वर्षा दत्तात्रय तांबे पाटील.सौ.रुपाली उमेश पडवळ,मोहिनी शैलेश शिंदे मुलगी व समस्त तांबे परिवार यांनी केले.
