महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदी माया शक्ती यमाई मातेच्या चैत्र शुद्ध पौर्णिमा उत्सव व हनुमान जयंती निमित्त वरुडे येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला असून कनेरसर ता. खेड जि. पुणे या ठिकाणी भाविकांची यमाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते त्यानिमित्ताने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व यमाई भक्तांना दर्शनाचा लाभ घेता यावा याकरिता खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यशिल कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांनी कुलस्वामिनी यमाई देवी मंदिरात आरती करून कनेरसर गावच्या ग्रामस्थां सोबत आढावा बैठक घेऊन उपयोजना अंतर्गत मार्गदर्शन केले.त्यावेळी सरपंच सौ.सुनिता केदारी,उपसरपंच कल्पनाताई झोडगे,उपसरपंच मच्छिंद्र वाघ,पोलीस पाटील विठ्ठल पवार,उद्योजक साहेबराव हजारे,सुनिलशेठ्ठ पारख,माऊली गोगावले सर्व दुकानदार महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
