महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई माता भक्तांचे हाकेला धावणारी.नवसाला पावणारी.मनोइच्छा पूर्ण करणारी आदिमाया शक्ती माहूरगडाची राणी आई जगदंबा कान्हो पाठकांचे अच्चाट भक्तीमुळे रेणूका माता ये माई हाक मारता प्रगट झालेली यमाई देवी आज ही प्रत्येकाच्या मना.. मनात स्थान करून बसली आहे.आज चैत्र शुद्ध पौर्णिमेचे अवचित साधुन संपूर्ण कनेरसर गावच्या ग्रामस्थांनी भक्तीभावाने दंडवत घेऊन चोळी पातळ वाहुन मनेभावी यमाई देवीची पूजा केली व शेरणी गुळ व पेढे वाटून आनंद साजरा केला.व यमाई मातेला साकडं घालून सुख समाधान चांगले आरोग्य मिळावे म्हणून देवीची मनेभावी पूजा केली . गेले कित्येक वर्षे पासून प्रथम मान हा पूर गावचे ग्रामस्थांचा चोळी पातळाचा असतो त्यांनी मान दिल्या नंतर यत्राला सुरुवात होते.ही यात्रेच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले असून.खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यशिल कर्तव्यदक्ष गुन्हेगारांनचे कर्दनकाळ कायदाचा वचक दाखवून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब.व बिट अंमलदार साबळे साहेब.शेळके साहेब व सर्व खेड पोलिस स्टेशनचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. यात्राच्या काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आहेत. महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनेक यमाई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन. निमगाव.खरपुडी या ठिकाणी खंडोबाचे दर्शनासाठी व तळी भंडार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत होती.
पुणे विभाग
कुलस्वामिनी यमाई देवीच्या दर्शनासाठी चैत्र शुद्ध पौर्णिमा उत्सव निमित्ताने अनेक यमाई भक्तांची कनेरसर येथे गर्दी
साप्ताहिक बातम्या
सुलतानपुरनगरीत ७० वा...
Oct 23, 2026
विभागीय वन अधिकारी, वन्यजीव,...
Oct 23, 2026
सुलतानपुरनगरीत...
Oct 23, 2026
