बातमीपत्र

वरुडे चौधरवाडी या ठिकाणी ऊॅ.चैतने कानिफनाथ महाराज यांच्या वर्धापनदिन ह.भ.प. वैष्णवी दिदी यांचे कीर्तन व कानिफनाथ महाराज यांची काठीची मिरवणूक काढण्यात आली

महाराष्ट्र ही संतांची जन्म भूमी आहे. महाराष्ट्राचे मातीत असे अनेक संत जन्माला आले की ज्यांनी कथा. कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या मनावर नीतीचे संस्कार दृढ करण्याचे महान कार्य केले.अशी ही महाराष्ट्राची संतपरंपरा ज्या मातीत वाढली रुजली त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीचा महिमा अगाध आहे अशा या वैभवसंपन्न कसदार काळ्या मातीत पुणे जिल्ह्याचे उत्तरेकडील वैभवसंपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे चौधरवाडी या ठिकाणी ऊॅ.चैतने कानिफनाथ महाराज यांच्या वर्धापनदिन ह.भ.प. वैष्णवी दिदी यांचे कीर्तन व कानिफनाथ महाराज यांची काठीची मिरवणूक काढण्यात आली होती.त्यावेळी कॄषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक युवकांचे आशास्थान असलेल्या उद्योजक सरपंच खरपूडी गावचे सुपुत्र जयसिंगशेठ सोपानराव भोगाडे त्याच प्रमाणे मा. पोलीस अधिकारी संपतराव तांबे पाटील हे उपस्थित होते त्याचप्रमाणे तरुण कार्यकर्ते चौधरवाडीची ग्रामस्थ.टाळकरी.माळकरी उपस्थित होते हा कार्यक्रम दोन दिवस चालणार असून किर्तनरुपी सेवेचा अनेक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन चौधरवाडीचे ग्रामस्थांनी केली त्यावेळी.बाळासाहेब चौधरी.पोपट चौधरी. रामदासशेठ चौधरी. . लक्ष्मणशेठ चौधरी चेअरमन.दिलीपराव चौधरी.मा.उपसरपंच. अर्जून चौधरी.अ्विनाश चौधरी वसंत चौधरी.व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा