पाईट लोढूंगवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे भाऊ सत्यवान महादू डांगले यांनी समाईक गटामधून येण्या जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे भाऊ ज्ञानेश्वर महादू डांगले यांच्या शेतातील आंबा काजू फणस नारळ पेरु अतंर्गत पीक व फळबागांचे आर्थिक नुकसान वडिलोपार्जित शेती मध्ये महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजना अंतर्गत नारळ,आंबा,पेरु,जाभंळ,फणस व अनेक प्रकारच्या झाडांची लागवड केली असून त्या झाडांचे संगोपनासाठी समाईक गटामधून असणारा वहिवाट रस्ता मिळवणे साठी महसूल विभाग कडे अर्ज केला असून व लाईव्ह महाराष्ट्र टिव्ही न्युजला मुलाखत दिली त्यावेळी सुरेशभाऊ आहेरकर झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा सरचिटणीस यांनी महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पभूथारक शेतकरी ज्ञानेश्वर महादू डांगले यांचा अडविलेला रस्ता मोकळा करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत आहे असे सांगितले.त्यावेळी प्रकाश बबन घुले,रामदास भाऊ आहेरकर,सौ.भिमाबाई ज्ञानेश्वर डांगले,सुशांत ज्ञानेश्वर डांगले उपस्थित होते.ज्ञानेश्वर महादू डांगले यांनी फळबाग लागवडीचा रस्ता त्वरित मोकळा करून मिळावा म्हणून शासन कडे विनंती केली आहे.
