मंचर तालुका आंबेगाव येथे झालेल्या लव जिहाद प्रकरणावर आवाज उठवण्यासाठी हिंदू जन गर्जना मोर्चा आंबेगाव तालुका यांनी एक दिवस देव देश आणि धर्मासाठी द्या या आवाहनाला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आज संपूर्ण दिवसभर मंचर शहरामध्ये कडकडीत बंद व सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प ठेवून हजारोंच्या संख्येने महिला भगिनीं आणि हिंदू बांधवांनी संपूर्ण मंचर शहरामध्ये प्रभात फेरी द्वारे विशाल मोर्चाने एकत्र येऊन एकतेचे दर्शन घडविले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल साहेब पुणे ग्रामीण एस पी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांनी मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी बांधवांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.
