बातमीपत्र

वसई : पावसाळ्यात खाण्या पिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते परंतु काही ठिकाणी पावसाळ्यात खराब आणि सडलेल्या गोष्टी मिळण्याच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळते.वसईच्या सतपाळा गावात अशीच घटना घडली आहे. सोमवारी १७ जुलै रोजी विकत घेण्यात आलेल्या डिलक्स कंपनीच्या ब्रेडला बुरशी लागलेली होती. पॅकेट उघडताच त्यात बुरशी लागलेले ब्रेड होते. नागरिकांनी या बाबत दुकानदाराकडे तक्रार केली असता बेकरी कंपनी ब्रेड शेवटच्या तारखे पर्यंत विकण्यास सांगत असल्याची माहिती दुकानदाराने दिली आहे.सदर ठिकाणी ठिकाणी नागरिकांनी बेकरी मालकाला बोलावले असता त्याने त्यांच्या कामगारांच्या हलगर्जीपणामुळे असे प्रकार होतात असे मान्य केले.कोरोनासारख्या महामारीतून नागरिक सावरत नाहीत तोवर अशा कंपन्या जर लोकांच्या जीवाशी खेळात असतील तर शासनाने सदर प्रकारची दाखल घेऊन या बेकरी कंपनीवर बंदी आणण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहेत तरी शासनाने याची दाखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.


साप्ताहिक बातम्या