बातमीपत्र

EDUCON 2026 — शिक्षकांसाठी भव्य AI Education & Technology Summit

मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने, प्रा. डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली “EDUCON 2026 – A Flagship One-Day AI Education & Technology Summit for Teachers” चे आयोजन रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी, सकाळी 9.00 वा., रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या AI कौशल्यविकासासाठी भारतातील सर्वात मोठ्या शिक्षक मेळाव्यांपैकी एक ठरणाऱ्या या विशेष AI लर्निंग वर्कशॉप मध्ये हजारो शिक्षकांना AI चा अध्यापनातील प्रभावी वापर, Lesson Planning, Content Creation, Assessment आणि Classroom Innovation याबाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन मिळणार आहे.

या भव्य AI Workshop मधून एकाच ठिकाणी सर्वाधिक शिक्षकांचा सहभाग नोंदवून जागतिक विक्रम (World Record) प्रस्थापित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे EDUCON 2026 हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून शिक्षकांच्या AI-सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.

सहभागी प्रत्येक शिक्षकाला Participation Certificate तसेच Workshop पूर्ण केल्यानंतर “AI-Competent Teacher” Course Completion Certificate प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई व परिसरातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इच्छुक शिक्षक, शिक्षण तज्ञ, मुख्याध्यापक, प्राचार्य इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमासाठी https://forms.gle/z7RNzyf2rBj1EA6t6 लिंक वापरून नोंदणी करावी. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत आहे. 

“Empowering Teachers with AI”
शिक्षक AI-सक्षम — शिक्षण अधिक सक्षम!

आपला - डॉ विशाल कडणे 
9594020888


आमच्यात सामील व्हा