बातमीपत्र

पोलिसांनी अखेर खासदार किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला

MP किरीट सोमय्या आज सकाळी संभाजी पार्क ला जनसंपर्क साठी आला होता.  
संभाजी पार्क इथे एक मराठी भाजी विक्रेता बसला होता. एक गृहिणी त्याच्याकडून घेतलेल्या भाजीचे पैसे त्या विक्रेत्याला देत होती. ते पैसे (रु २० ची एक नोट व रु १० ची एक नोट) MP किरीट सोमय्या ने त्या भाजी विक्रेत्याकडून हिसकावून घेतले व फाडून टाकले आणि त्या विक्रेत्याच्या तोंडावर फेकले आणि इथे भाजी विकायला बसायचे नाही असा दम दिला आणि सोबत पोलिस होते त्यांना ह्या भाजी विक्रेत्यावर कारवाई करायला सांगितले. पोलिसांनी त्या विक्रेत्याला पोलिस स्टेशन ला नेवून कारवाई केली आणि रु १२०० चा दंड केला.
ही बातमी समजल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन ला जावून किरीट सोमय्या ने भारतीय चलनाच्या नोटा फाडून भारतीय संविधानाचा अपमान व जनतेच्या मालमत्तेचे नुकसान केले म्हणून पोलिसांना किरीट सोमय्या विरोधात NC दाखल करण्यास भाग पाडले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा