बातमीपत्र

व्यावसायिक अभ्यासक्रमा अंतर्गत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण केलेली प्रगती व आलेले अनुभव अकरावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी शाळेतील सभागृहात यशस्वीपणे कथन केले

दादर येथील शारदाश्रम विद्या मंदिरात व्यावसायिक अभ्यासक्रमा अंतर्गत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण केलेली प्रगती व आलेले अनुभव अकरावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी शाळेतील सभागृहात यशस्वीपणे कथन केले. यावेळी अकरावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

शारदाश्रम विद्या मंदिर 
प्रत्येक वर्षी 12 वी च्या एच एस सी, व्होकेशनल विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास अंतर्गत OJT(on the job training) आपले अनुभव कथन केले. ज्या मध्ये आम्ही अकरावीत शिकत असताना  मे महिन्याच्या सुट्टीत कोणत्या आस्थापणेत आम्हीकाय काम शिकलो, कोणते अनुभव आले, ते नवीन 11वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्वतःचे अनुभव कथन करून नवीन मुलांना पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन केले. व त्यांना ojt चा काय फायदा झाला या बाबत विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे अनुभव अकरावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.  
आपल्या शाळेत अभ्यासक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याकडे  शिक्षक विशेष लक्ष देतात, अनुभवी तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असतात, अकरावी व बारावी साठी विद्यार्थ्यांना दोन भांषासह सहा विषयांची परीक्षा द्यावी लागते,सदर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांच्या आस्थापनात नोकरीची सुवर्णसंधी देण्यात शाळांचे व्यवस्थापन समिती महत्त्वाचे योगदान देत असते.तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर बारावीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने अनेक विद्यार्थी नोकरी करत असताना पदवीचे शिक्षणही पूर्ण करु शकतात, अशीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली. तसेच,12 वी च्या विद्यार्थ्यांनी  अनेक उत्तमोत्तम उदाहरणे देऊन banking, computer, electronics, Automobile, electrical & mechanical या व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी आपले ojt अनुभव कथन करून , शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागते हे शिक्षणाचे खरे यश असते, त्याच बरोबर योग्यता आणि तुमच्या तील कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत या बाबत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महत्व हे प्रगतीचे लक्षण असुन याचा विद्यार्थ्यांना निश्चितच चांगला उपयोग होईल, असेही मत यावेळी विद्यार्थ्यांनी मांडले. याप्रसंगी,शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मुख्याध्यापक मंगेश कोचरेकरसर, उपमुख्याध्यापक शिवाजी जाधवसर, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बोरसेसर आदि सर्व शिक्षकांनी मौलिक मार्गदर्शन केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा